Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाल्मिक कराडसाठी पेटवून घेणाऱ्याची ओळख पटली; कुंटणखाना प्रकरणात झाली होती पत्नीला अटक

वाल्मिक कराडसाठी पेटवून घेणाऱ्याची ओळख पटली; कुंटणखाना प्रकरणात झाली होती पत्नीला अटक



बीड : खरा पंचनामा 

एकीकडे वाल्मिक कराड याला मोक्का लागला तर दुसरीकडे राज्याचे वातावरण पेटले. याला कारण आहे त्याचे समर्थक. वाल्मिक कराडला चुकीच्या गुन्ह्यात अटक केली असून त्याची ताबडतोब सुटका करावी, या मागणीसाठी त्याच्या समर्थकांनी कराडला मोक्का लावताच 10 मिनिटांत परळी बंद केली.

यामुळे परळीत तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. तर दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. काल त्याला पोलीस कोठडी सुनावताच कोर्टाबाहेर देखील समर्थकांनी गदारोळ घातला. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता.

हे प्रकरण इथंवरच थांबले नाही. तर कराडच्या समर्थनार्थ दोन व्यक्तींनी पेटवून घेतले होते. कराडसाठी जीव देणारे ते दोघे कोण? अशा चर्चांना उधाण आले होते. अशातच आता त्या दोघांची नावे समोर आली असून एकाची माहिती समोर आली आहे. पेटवून घेणाऱ्या एकाचे नाव दत्ता जाधव (राहणार फुलेनगर परळी) असे आहे. तर तीन वर्षांपूर्वीच्या बातमीनुसार कुंटणखाना चालवणाऱ्या ज्या महिलेला अटक झाली होती तिचे नाव जयश्री दत्ता जाधव (राहणार फुलेनगर परळी) असे आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया फ्रंट प्रदेश अध्यक्ष महादेव बालगुडे यांनी एक्सवर माहिती दिली आहे. "कराडच्या समर्थनार्थ पेटवून घेणाऱ्याचे नाव दत्ता जाधव राहणार फुलेनगर परळी असे आहे तर तीन वर्षांपूर्वीच्या बातमीनुसार कुंटणखाना चालवणाऱ्या ज्या महिलेला अटक झाली होती तिचे नाव जयश्री दत्ता जाधव राहणार फुलेनगर परळी असे आहे. असे अजून चांगले लोक कराडच्या समर्थनार्थ पुढे आले पाहिजेत," अशा आशयाची पोस्ट बालगुडे यांनी एक्सवर केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.