एफआयआरमध्ये मराठी भाषेच्या अक्षम्य चुका, पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश
मुंबई : खरा पंचनामा
एफआयआरमध्ये मराठी भाषेच्या अक्षम्य चुका असल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. याबाबत पोलीस उप निरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने डीसीपींना दिले आहेत.
आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अनिल देवरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकल पीठाने डीसीपी परिमंडळ-6 यांना दिले आहेत. गुह्याचा तपशीलही चुकीचा नोंदवला गेला आहे. या एफआयआरची प्रत डीसीपी परिमंडळ-6 यांना पाठवून द्यावी. जेणेकरुन त्यांना योग्य ती कारवाई करता येईल, असेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी 31 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. विनयभंगाच्या गुन्हयात सत्र न्यायालयाने दिलेले अटकेपासून संरक्षण रद्द करण्यात आले. त्या विरोधात जाईद अंसारीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर एकल पीठापुढे सुनावणी झाली.
अशा आहेत चुका
वर्शापासून, षिवाजीनगर, षिफासोनी व लोखंडी रॉड असे चुकीचे शब्द गुन्हा नोंदवताना नमूद करण्यात आले. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या एफआयआरचा मसुदा स्वतः पोलीस उप निरीक्षक देवरे यांनी तयार केला व त्यांनीच तो टाईप केला, असेही न्यायालयाने नमूद केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.