Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोटातल्या बाळाच्या पोटातही बाळ! महाराष्ट्रात जगातील सर्वात दुर्मिळ घटना, डॉक्टरही चक्रावले

पोटातल्या बाळाच्या पोटातही बाळ! 
महाराष्ट्रात जगातील सर्वात दुर्मिळ घटना, डॉक्टरही चक्रावले



बुलढाणा : खरा पंचनामा 

महाराष्ट्रातील बुलढाणा इथं सरकारी रुग्णालयामध्ये नुकताच एक असा प्रकार घडला, ज्यामुळं आरोग्य यंत्रणाही हैराण झाली, डॉक्टरही चक्रावले. कारण हा असा दुर्मिळ प्रकार इथं पूर्णपणेच अनपेक्षित होता. बुलढाण्यात एका महिलेच्या सोनोग्राफी रिपोर्टनं डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. यामागचं कारणंही तसंच होतं.

गरोदर महिलेच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्याही पोटात एक बाळ असल्याचं सोनोग्राफीमध्ये दिसून आलं. वैद्यकिय भाषेत अशा प्रकरणाला 'फीट्स इन फिटु' असं म्हटलं जातं.

दोन आठवड्यांपूर्वी बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील एका गावात 9 महिन्यांची गरोदर महिला (32 वर्षे वय) सरकारी रुग्णालात पोहोचली. इथं डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी महिलेची सोनोग्राफी केली आणि त्याचवेळी त्यांना काहीतरी संशयास्पद गोष्ट आढळली. महिलेच्या गर्भामध्ये एक बाळ दिसलं, सोबतच या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ दिसलं आणि ही दृश्य पाहून डॉक्टरही हैराण झाले.

बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागात राहणाऱ्या य महिलेने नियमित तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले होते. सोनोग्राफी तपासणीदरम्यान डॉक्टरांना ही बाब लक्षात आली. सोनोग्राफी करणारे डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी निरीक्षणादरम्यान वारंवार तपासणी केली असता, सोनोग्राफीमध्ये गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भात आणखी एक गर्भ असल्याचे स्पष्ट दिसून आले. ३५ आठवड्यांहून अधिकच्या या गर्भामध्ये काही हाडे आणि गर्भासारखी रचना दिसून आली. ही घटना वैद्यकीय क्षेत्रात एक आश्चर्यकारक घटना मानली जात आहे. "फीटस इन फीटू" मध्ये एका जुळ्या भावाच्या किंवा बहिणीच्या शरीरात दुसऱ्या जुळ्या भावाचा किंवा बहिणीचा अपूर्ण विकास होतो. ही स्थिती गर्भावस्थेतच निर्माण होते आणि दुसरा गर्भपहिल्या गर्भाच्या शरीरात वाढतो. या दुर्मिळ घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात कुतूहल निर्माण झाले आहे.

डॉक्टर अग्रवाल यांनी तातडीनं ही बाब वरिष्ठ डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली आणि या महिलेच्या प्रसूतीसाठी तिला तातडीनं संभाजीनगर इथं पाठवण्यात आलं. दरम्यान, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अग्रवाल यांना याविषयीची माहिती आणि धोका विचारला असता या प्रकरणात महिलेच्या जीवाला कोणताही धोका नाही. पण, प्रसूतीनंतर बाळावर उपचार झाले नाहीत, तर मात्र त्याच्या वाढीत समस्या उदभवू शकतील ही बाब स्पष्ट केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.