Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस विभागासाठी उत्कृष्ट योगदान, निष्कलंक, सचोटीसह कर्तव्यनिष्ठ गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळेच सुनिल फुलारी यांना मिळाले सर्वोच्च राष्ट्रपती पदक!

पोलीस विभागासाठी उत्कृष्ट योगदान, निष्कलंक, सचोटीसह कर्तव्यनिष्ठ गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळेच सुनिल फुलारी यांना मिळाले सर्वोच्च राष्ट्रपती पदक!



कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे पोलीस विभागासाठी उत्कृष्ट योगदान, निष्कलंक, सचोटीसह कर्तव्यनिष्ठ गुणवत्तापूर्ण कामगिरी व प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी असा त्यांचा पोलीस विभागातील नावलौकिक आहे. त्यांनी पोलीस दलात आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

सुनिल फुलारी यांनी नागपूर, जळगाव, सांगली, पुणे, नाशिक येथे कार्यरत असताना गंभीर व गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे कार्य केले. पुणे शहरात आर्थिक गुन्हे शाखा व सायबर लॅब स्थापन करुन आर्थिक व सायबर सुरक्षा वाढवली. सामाजिक पोलिसिंग उपाय योजनांची अंमलबजावणी करुन सेवा प्रकल्पासारख्या नाविन्यपूर्ण योजना दुर्बल घटकांचे मदतीसाठी राबविल्या. गडचिरोली, चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. नागपूर शहरात मोका व एमपीडीए कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन गंभीर गुन्ह्यांमधील घट घडवून उत्कृष्ट कामगिरी केली.

कोल्हापूर, सातारा, मिरज, विशालगड येथील जातीय संघर्ष/ हिंसाचार, मराठा आरक्षणविषयक आंदोलने या दरम्यान समाजामध्ये तणावाची परिस्थिती उद्भवली असता जातीय सलोखा राखून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाय योजना सातत्याने राबवून समाजामध्ये सलोख्याचे वातावरण मनर्माण केले. कोल्हापूर शहरातील दंगल, विशाळगड अतिक्रमण, पुसेसावळी औंध दंगल अशा दंगलसदृश्य परिस्थितीत जातीय घटनांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कौशल्यपूर्ण मार्गाने व सुसंवादाने सर्व परिस्थिती स्वतः हाताळून शांतता निर्माण केली. लोकसभा, विधानसभा २०२३ निवडणुका हिंसाचारमुक्त झाल्या. वन्य जीव गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हेल मासा उलटीची तस्करी करणारी टोळींचा छडा लावून अंदाजे ४५ कोटींचा अवैध माल जप्त करुन यशस्वी कारवाई केली. कोल्हापूर परिक्षेत्रातून उत्कृष्ट कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे व शिरोळ पोलीस ठाणे हे सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे म्हणून २०२४ साठी घोषित झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.