आयजी सुनिल फुलारी, रवींदर सिंघल यांच्यासह 4 पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर
अन्य 39 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश
फुलारी, सिंघल यांनी सांगलीत बजावली होती सेवा
मुंबई : खरा पंचनामा
प्रत्तासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींदर सिंघल यांच्यासह चार अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यांच्यासह राज्यातील ३९ पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात सेवा बजावली आहे.
विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. रवींदर कुमार झिलेसिंग सिंघल, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय राजाराम कराळे, पोलीस महानिरीक्षक सुनिल बळीरामजी फुलारी, समादेशक रामचंद्र बाबु केंद्रे यांना जाहीर करण्यात आले आहे.
राष्ट्रपती पदक जाहीर झालेले कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक या पदावर 2014 ते 2015 या काळात सेवा बजावली आहे. तर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींदर कुमार सिंघल यांनी सांगली शहर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक या पदावर 1999 ते 2000 या काळात सेवा बजावली आहे.
राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या राज्यातील अन्य अधिकाऱ्यांची नावे अशी : संजय दराडे, बिरेंद्र मिश्रा, आरती सिंह, चंद्रकिशोर मीना, दीपक साकोरे, राजेश बनसोडे, सुनिल तांबे, ममता डिसोजा, धर्मपाल बनसोडे, मधुकर सावंत, रोशन यादव, राजेंद्र कोते, अनिल लाड, अरुण डुंबरे, नजीर शेख, श्रीकांत तावडे, महादेव काळे, तुकाराम निंबाळकर, आनंदराव मस्के, रवींद्र वानखेडे, सुरेश मनोरे, राजेंद्र वाघ, संजय जोशी, दत्तू गायकवाड, नंदकिशोर बोरोळे, आनंद जंगम, सुनीता पवार, जितेंद्र म्हात्रे, प्रफुल्ल सुर्वे, राजेंद्र काळे, सलीम शेख, तुकाराम आव्हाळे, रामभाऊ खंडागळे, संजय चोबे, सय्यद हुसेन, विजय जाधव, रामराव नागे, दिलीप राठोड, आयुब मुल्ला.
प्रजासत्ताक दिनाच्या पुरवसंध्येला एकूण 95 जणांना गेलेन्ट्री पदक, 101 जणांना विशेष सेवा पदक, 945 जणांना राष्ट्रपतीचे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.