कोल्हापुरातील 'आरटीओ' एजंट अमित भोसलेला शाहूपुरी पोलिसांकडून अटक
कोल्हापूर : खरा पंचनामा
'माझ्या कामात ऑब्जेक्शन घ्यायचे नाही. नाही तर मी तुम्हाला बघून घेतो', अशी धमकी देऊन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अंगावर रजिस्ट्रर फेकून अंगावर धावून जाणाऱ्या एजंटास आज अटक करण्यात आली.
अमित ऊर्फ प्रशांत रामदास भोसले (वय ३७, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. २३ जानेवारीला दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याची फिर्याद सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांनी दिल्यानंतर पोलिसांनी आज अमित ऊर्फ प्रशांतला सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, २३ जानेवारीला दुपारी सव्वाच्या सुमारास सावदेकर त्यांच्या केबिनमध्ये दैनंदिन कामकाज करीत होते. त्यावेळी अमित हा त्यांच्या केबिनमध्ये विनापरवाना गेला. तेथे तुमच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक उमेश गिते याने माझ्या वाहनांच्या पेपरवर ऑब्जेक्शन का लावले? माझ्या पेपरला आताच्या आता मंजुरी द्या', असा दबाव टाकला. कामात विनाकारण अडवणूक केली. तसेच धमकी देऊन बघून घेतो, असा इशारा दिला. अंगावर रजिस्ट्रर फेकून धावून जाण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद रजिस्ट्रर फेकून धावून जाण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद सावदेकर यांनी शाहूपुरी पोलिस पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली आज भोसलेला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही. डी. मुळे करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.