फरार असताना वाल्मिकने धनंजय मुंडे अन् स्वतःच्या नावावर असलेल्या मालमत्ता ट्रान्सफर केल्या?
पुणे : खरा पंचनामा
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. एकीकडे या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असून त्याच्यामागे धनंजय मुंडे असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करीत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी देखील मागणी सातत्याने होत आहे. आता पुन्हा एकदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत मागणी केली आहे.
पुणे दौऱ्यावर असलेल्या अंबादास दानवे यांनी विविध विषयावर माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दानवे म्हणाले, मंत्रिपदाच्या कार्यकाळातील धनंजय मुंडे यांचे कामकाज वाल्मिक कराड हाच सांभाळत होता.
वाल्मिक कराड हा मुंडे यांचा सावलीसारखा काम करणारा उजवा हात आहे. अनेक मालमत्ता या दोघांच्या एकत्रित आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या काळामध्ये कराड हा फरार होता त्यावेळेस त्यांनी या संपत्ती वेगवेगळ्या नावाने ट्रान्सफर केल्या असल्याचा दावा दानवे यांनी केला.
धनंजय मुंडे आणि कराड याचे संबंध असल्याचे स्पष्ट असताना देखील सरकार याबाबतचे पुरावे मागत आहे. कराड आणि मुंडे हे सावली सारखे एकमेकांसोबत असताना असताना देखील सरकार राजीनामा न घेत धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे. मात्र नैतिकदृश्य धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारने घेणे आवश्यक आहे.
सरकार मधील अनेक जण मुंडे यांची बाजू घेत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत, सरकारला अजून कुठले पुरावे पाहिजे. धनंजय मुंडे आणि कराड एक आहे. या बाबत विरोधी पक्षांनी आवाज उठवला आहे, असे दानवे म्हणाले.
बीडची पोलिस यंत्रणा असून नसल्यासारखी आहे. कोणी मुक्तपणे काम करीत नाही. अधिकारी पण बीडला काम करीत नाही, मुंडे आणि कराड यांचेच बगलबच्चे काम करीत आहेत, असा आरोप दानवेंनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.