दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींविरुद्ध गुन्हा दाखल
दिल्ली : खरा पंचनामा
आचारसंहिता भंग प्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आज (दि. १४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वृत्त 'इंडिया टूडे 'ने दिले आहे.
नवी दिल्ली जिल्ह्यातील नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात आम आदमी पक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम आदमी पक्ष बनावट फोटो वापरून प्रचार करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक समिती स्थापन केली आहे. दरम्यान, निवडणुकीत सरकारी वाहन वापरल्याबद्दल गोविंद पुरीमध्ये मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेली पोहचली आहे. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. कालकाजी विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार आणि मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी उमेदवारी रॅली काढली, परंतु त्या उमेदवारी अर्ज दाखल न करताच परतल्या. नावनोंदणीसाठी उशिरा पोहोचल्याने त्यांना माघारी परतावे लागले. आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.