पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यावर कॉन्स्टेबलने केला जीवन संपवण्याचा प्रयत्न
नागपूर : खरा पंचनामा
नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांच्या जामठा येथील बंगल्यावर रात्रपाळी मध्ये तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
विशाल तुमसरे (वय५०, रा. हिंगणा) असे पोलिस कॉन्स्टेबल चे नाव आहे. २०२३ ला ते राज्य राखीव दलातून (एसआरपीएफ) ग्रामीण पोलिसमध्ये बदली होऊन आले होते. आज सकाळी अचानक गोळी चालण्याचा आवाज ऐकू आल्याने पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार बाहेर आले. यावेळी विशाल हे रक्ताच्या थारोळ्यात गार्ड रूममध्ये पडलेले दिसल्याने त्यांनी तत्काळ आपले वाहन आणि आरपिटीसीसह त्यांना एम्स मध्ये दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले.
विशाल यांना पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांनी शेअर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतविला होता. मात्र, त्यात बुडल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. तयातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ हर्ष पोद्दार यांनी दिली. तसे सुसाईड नोट त्याच्या डायरी मध्ये सापडल्याचे ते म्हणाले. त्यात त्याने हे नमूद केल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.