Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गरीब, सामान्य कैद्यांचे दंड, जामिनाची रक्कम सरकार भरणार!

गरीब, सामान्य कैद्यांचे दंड, जामिनाची रक्कम सरकार भरणार!



मुंबई : खरा पंचनामा 

कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी गरीब, सामान्य कैद्यांचे दंड भरणे किंवा जामिनाची रक्कम भरण्यास 'आर्थिक' मदत ही विशेष योजना लागू करण्यात आली आहे. त्याकरिता केंद्र शासनाने पुढाकार घेतला असून, या योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चार सदस्यीय पर्यवेक्षी समिती गठित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने गृह विभागाने १० जानेवारी रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

'सपोर्ट टू पुअर प्रीझन' या अंतर्गत मध्यवर्ती, जिल्हा, महिला, खुले कारागृहातील कैद्यांना आर्थिक मदतीचा हात मिळणार आहे. यात गरीब कैदी, सामाजिक दृष्ट्या वंचित, कमी शिक्षित, अल्पउत्पन्न गटातील कैद्यांना लाभ होऊन कारागृहाबाहेर येण्यास मदत होईल.

दारिद्र्य, अज्ञान, निरक्षरता आणि उपेक्षित दुर्बल घटकातील कैद्यांना केंद्र शासनाच्या 'सपोर्ट टू पुअर प्रीझन' या योजनेची मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाने चार सदस्यीय समिती गठित केली आहे. यात अध्यक्षपदी पुणे आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, सदस्य म्हणून येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे, तर सदस्य सचिव नागपूर कारागृह उपनिरीक्षक कार्यालयाचे उपअधीक्षक दयानंद सोरटे यांचा समावेश आहे. या समितीची कार्यकक्षा शासनाने ठरवून दिली आहे. त्यानुसार दर महिन्याला बैठकीचे आयोजन करून सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.