अभिनेता श्रेयस तळपदे, अलोक नाथ विरोधात FIR; कोट्यवधींची फसवणूक
सोनिपत : खरा पंचनामा
बॉलिबूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेता अलोक नाथ यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार एका कंपनीशी जोडलेला आहे. इंदौरमधील एक नोंदणीकृत सोसायटीत ५० लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेली आहे.
हा एफआयआर हरियाणातील सोनीपतमध्ये नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे या कलाकारांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयस तळपदे आणि अलोकनाथ यांनी या कंपनीची जाहिरात केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या कंपनीच्या कार्यक्रमात सोनू सूद देखील प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.
काही दिवसांपूर्वी मुंबई टोरेस प्रकरण समोर आलं होत. ज्यात टोरेसमधील सर्व कर्मचारी आणि मालक ग्राहकांनी चुना लावून पळून गेले होते. आता असाच एक प्रकार इंदौरमध्ये झालाय. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, या कंपनीनं ६ वर्षांपूर्वी लोकांकडून पैसे वसूल केले. कंपनीत फिक्स्ड डिपॉझिट किंवा इतर मार्गांनी गुंतवणूक केल्यास लोकांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देण्यात आलं होत. त्याचबरोबर लोकांचा विश्वास जिंकत महागड्या हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करण्यात आले होते. प्रोत्साहनांच्या नावाखाली बहु-स्तरीय मार्केटिंगच्या स्तरावर एजंट तयार करण्यात आले. काही महिने लोकांना पैसे दिले गेले, पण कोट्यवधी रुपये जमा झाले तेव्हा हे प्रकरण दुसऱ्याच मार्गाच्या दिशेने वळलं. कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करत असताना लोकांनी पैसे मागण्यास सुरुवात केली तेव्हा कंपनीचे अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करू लागले.
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, या कंपनीनं ६ वर्षांपूर्वी लोकांकडून पैसे वसूल केले. कंपनीत फिक्स्ड डिपॉझिट किंवा इतर मार्गांनी गुंतवणूक केल्यास लोकांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देण्यात आलं. प्रोत्साहनांच्या नावाखाली बहु-स्तरीय मार्केटिंगच्या स्तरावर एजंट तयार करण्यात आले. कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करत असताना लोकांनी पैसे मागण्यास सुरुवात केली तेव्हा कंपनीचे अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करू लागले. या प्रकरणाबाबत गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आल्यास लोकांनी पोलिसांची मदत घेतली. पोलिसांच्या माहितीनुसार श्रेयस तळपदे आणि अलोकनाथ यांच्याव्यतिरिक्त एकूण ११ जण असल्याची माहिती मिळाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.