मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक
1.7 किलो गांजा, मोपेड जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरजेत सोलापूर एक्सप्रेस वेवरील उड्डाण पुलाखाली गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1.7 किलो गांजा, एक मोपेड असा 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
अरबाज शफीक पटेल (वय 20, रा. म्हैसाळ रोड, चाँद कॉलनी, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर अल्ताफ ऊर्फ बावा जमादार हा पसार झाला आहे. भारत सरकारच्या "नशामुक्त भारत अभियान"च्या पार्श्वभूमीवर सहायक निरीक्षक शिंदे यांनी अमली पदार्थ विक्री, साठा, वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या आहेत.
पथक सोलापूर एक्सप्रेस वे परिसरात गस्त घालत असताना अंकलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका उड्डाण पुलाखाली एकजण गांजा विक्री करण्यासाठी मोपेडवरून आल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून पटेल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ दोन किलो गांजा सापडला. तो तसेच त्याच्याकडील मोपेड जप्त करून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने तो गांजा मिरजेतील अल्ताफ जमादार याच्याकडून घेतल्याची कबुली दिली.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, विठ्ठल गुरव, अभिजीत पाटील, राहूल क्षीरसागर, नाना चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, अमोल तोडकर, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, चालक सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनिल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.