कुंडल वनविभाग प्रशिक्षण केंद्रातील 63 जणांना अन्नातून विषबाधा
पलूस, कुंडल, सांगली सिव्हिलमध्ये उपचार सुरु
सांगली : खरा पंचनामा
पलूस तालुक्यातील कुंडल येथील वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्रात तब्बल 63 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील रुग्णांवर पलूस, कुंडल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
कुंडल येथे राज्य शासनाचे वन विभागाचे प्रशिक्षण केंद्र आहे. तेथील प्रशिक्षणार्थिना जेवणात चिकन देण्यात आले होते. जेवण केल्यानंतर काही जणांना उलट्या सुरु झाल्या. काही वेळाने 63 जणांना जेवणानंतर त्रास सुरु झाला. त्यातील काहींना पलूस, कुंडल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. तरी गंभीर प्रकृती झालेल्याना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
तीनही ठिकाणी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित असून रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रम कदम यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.