दबंग पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे गांधीनगर ठाण्याचे प्रभारी
कोल्हापूर : खरा पंचनामा
गांधीनगर पोलीस ठाण्यात निरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी वारंवार होत होती. त्याची दखल घेत दबंग पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांची गांधीनगर ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गांधीनगर पोलीस ठाणे अंतर्गत उचगाव, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, वळीवडे, वसगडे या मोठ्या विस्तारित, दाट वस्तीच्या गावांचा समावेश आहे. पुणे-बंगळूर महामार्गाचा काही भाग या पोलीस ठाण्यांतर्गत येतो. त्यामुळे येथे पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.