बिसूरच्या मातीत घडतोय कुस्ती मल्ल!
आयुष शहाजीराव साळुंखेने पटकावले सतरा वर्षाखालील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक
सांगली : खरा पंचनामा
बिसूरच्या मातीने आजपर्यंत अनेक व्यक्तिमत्वे घडवलेली आहेत. कला क्रीडा, साहित्य, नाटक, वैद्यकीय सांस्कृतिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रातील दिग्गज नररत्ने बिसूरच्या मातीने चमकवली आहेत. तीच परंपरा आजच्या नव्या पिढीमध्ये देखील तशीच जागती आहे.
आजही अनेक नव्या दमाचे शिलेदार आपापल्या क्षेत्रात देदीप्यमान कर्तुत्व निर्माण करण्याची अभिलाषा अंत:करणात ठेवून बिसुरचे नाव आभाळभर उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचीच प्रचिती रविवारी 9 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या स्टेअर्स फाउंडेशन नवी मुंबई आयोजित स्टेअर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 -25 मध्ये आली आहे.
बिसूरच्या मातीत जन्मलेला उद्याचा कुस्ती मल्ल आयुष शहाजीराव साळुंखेची नुकतीच जिल्हास्तरावर निवड झाली होती. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड होऊन आज रविवारी 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात त्याने ब्राँझ पदक पटकावून बिसूरच्या नावलौकिकात भर घातली आहे.
सध्या तो आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान उत्तम पाटील कुस्ती केंद्र, कवलापूर येथे कुस्ती विद्येचे धडे गिरवत आहे. त्याच्या या यशाने निश्चितच सर्व बिसूरकरांची छाती अभिमानाने भरून पावली आहे. आयुष हा बिसूरमधील ज्येष्ठ नागरिक धोंडीराम साळुंखे यांचा तसेच निवृत्त प्राचार्य, ज्येष्ठ पत्रकार जे. के. बसुगडे (साळुंखे) यांचा नातू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.