Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतल्या पमू, दिनूची कोटीच्या कोटींची उड्डाणे बिल्डरांशी साटेलोटे, साहेबांची सोडून यांच्याच २० टक्क्यांची चर्चा

सांगलीतल्या पमू, दिनूची कोटीच्या कोटींची उड्डाणे
बिल्डरांशी साटेलोटे, साहेबांची सोडून यांच्याच २० टक्क्यांची चर्चा



सांगली : खरा पंचनामा

सांगलीत रूजू होण्यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या साहेबांची तथाकथित स्वीय सहायक असणारे पमू आणि दिनूची महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांच्या कोटीच्या कोटींची उड्डाणांची रसभरित वर्णने सध्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात सुरू आहेत. आलिशान बंगल्यात राहणाऱ्या या सहायकांचे बिल्डरांशी साटेलोटे आहेच शिवाय साहेबांची सोडून यांच्या २० टक्क्यांची खुमासदार चर्चा तीनही शहरात सुरू आहे. 

ज्या साहेबांचे हे स्वीय सहायक आहेत त्यांच्यावर पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे साहेब यांच्या कारनाम्यांकडे किती लक्ष देतील हा प्रश्नच आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात आलिशान बिल्डिंग उभारल्या जात आहेत. त्यामध्ये यांचे फ्लॅट किंवा दुकानगाळ्यांच्या मागणीने बिल्डर लॉबीही त्रस्त झाली आहे. 'ब्लॅकबेरी'वर बोलत आलिशान कारमधून हे दोघे तीनही शहरात उच्चांकी वसूली करत आहेत. 

या दोघांचाही वसूलीचा व्याप एवढा वाढला आहे की, पमूने गावाकडील सहा लोकांना वसुलीचा रोजगार दिला आहे. यातून या दोघांची कमाई किती असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. शिवाय फ्लॅट आणि दुकान गाळ्यांची बातच न्यारी आहे. बिल्डरांबरोबरच तीनही शहरातील खासगी रूग्णालयांमधील बरीच औषध दुकानेही या जोडगोळीने नातेवाईक, मित्र मंडळींच्या नावे घेतल्याचीही चर्चा आहे. या दोघांची ईडीकडून चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. मात्र मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण असा प्रश्न आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.