Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यात जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी ६ केंद्रांना मान्यता

राज्यात जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी ६ केंद्रांना मान्यता



मुंबई : खरा पंचनामा 

जुन्या आणि निरुपयोगी वाहनांचे पर्यावरणपूरक स्क्रॅपिंग करण्यासाठी राज्यात ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात सुरू असून, वाहनधारकांनी आपल्या जुन्या वाहनांचे निष्कासन (स्क्रॅपिंग) अधिकृत केंद्रांमार्फतच करावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

वाहन स्क्रॅपिंग धोरण अंतर्गत, वाहनधारक जुने व निरुपयोगी वाहन अधिकृत स्क्रॅपिंग केंद्रांमध्ये जमा केल्यास त्यांना काही महत्त्वाचे लाभ मिळणार आहेत. यामध्ये नवीन वाहन खरेदी करताना एकूण कराच्या १० टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय, वाहने अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, तसेच प्रदूषण नियंत्रण, इंधन कार्यक्षमता वाढ आणि देखभाल खर्चात कपात यासारखे फायदे देखील होणार आहेत. या धोरणामुळे अनेक सकारात्मक परिणाम होणार असून, त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

• प्रदूषणावर नियंत्रण : जुन्या आणि धुराड्या वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण कमी होईल.
• वाहन सुरक्षेत सुधारणा : नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज वाहने वापरात आल्यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
• इंधन कार्यक्षमता वाढ : जुन्या वाहनांपेक्षा नवीन वाहने अधिक इंधन कार्यक्षम असतील, ज्यामुळे इंधनाचा खर्च कमी होईल.
• देखभाल खर्चात बचत: जुन्या वाहनांवर वारंवार होणारा देखभाल खर्च टाळता येईल.
• अर्थव्यवस्थेला चालना नवीन वाहनांची मागणी वाढल्यामुळे वाहन उद्योगाला चालना मिळेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडतील.

केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम, २०२१ लागू केला आहे, ज्याअंतर्गत वाहन स्क्रॅपिंग प्रक्रियेस अधिकृत स्वरूप देण्यात आले आहे. या नियमांनुसार, जुन्या आणि निष्प्रभझालेल्या वाहनांचे योग्य रीतीने स्क्रॅपिंग होणे आवश्यक आहे. राज्यात मंजूर झालेल्या या सहा स्क्रॅपिंग केंद्रांची माहिती लवकरच परिवहन विभागाकडून जाहीर केली जाणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.