Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता लवकरच वसणार चौथी मुंबई ! कुठं आणि कशी असेल?

आता लवकरच वसणार चौथी मुंबई ! कुठं आणि कशी असेल?



मुंबई : खरा पंचनामा 

मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. आता याच मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. पालघरमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराच्या नजीक चौथी मुंबई उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्राच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.

पनवेलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, 'जेएनपीटी', नैना क्षेत्रातील विविध विकासप्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यात 'तिसरी मुंबई' उभी राहत आहे. आता त्या पाठोपाठ पालघर जिल्ह्यात 'चौथी मुंबई' आकाराला येणार आहे. पालघर जिल्ह्यात जगातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे वाढवण बंदर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे विमानतळ, मुंबईतून थेट पालघरला जोडणारा सागरी मार्ग, बुलेट ट्रेन असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहेत. ही नव्याने वसणारी चौथी मुंबई हे मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हीटी असणारे शहर ठरणार आहे.

चौथ्या मुंबईसाठी 107 गावांतील 512 चौ. किमी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच एमएसआरडीसीचा नवे शहर उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नीती आयोगाने मुंबई महानगरला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात आर्थिक विकास केंद्र (ग्रोथ हब) उभारली जाणार आहेत.

वाढवण हे जागातील पहिल्या 10 मोठ्या बंदरांपैकी एक असेल. बंदरामुळे भविष्यात वाढवण आणि पालघरचा विकास झपाट्याने होणार आहे. ही बाब लक्षात घेता येथे अनेक सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. त्यातून सरकारने वाढवण विकास केंद्राचा निर्णय घेतला गेला आहे. चौथ्या मुंबईच्या निर्माणात वाढवण बंदर हा प्रकल्प जितका महत्त्वाचा, तितकाच वर्सोवा-विरार-पालघर सी-लिंक हा प्रकल्पही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नरिमन पॉईंट ते पालघर हा प्रवास केवळ एक तासांत करणे शक्य होईल.

वाढवण बंदरामार्गे आलेल्या माल साठवण्यासाठी लॉजिस्टीक पार्क, बंदरामुळे उद्योग विश्वातील अनेकांची या भागात ये-जा वाढेल. त्या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे प्रस्तावित आहे. मनोरंजनाच्या अनुषंगाने रिक्रिएशन ग्राउंड असतील. यामध्ये गोल्फ कोर्सचा समावेश असेल. कन्व्हेंशन सेंटर्स उभारली जातील. वाढवण बंदर ते दिल्ली मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर दरम्यान मालाची जलद आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी रेल्वेचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असेल. नव्या शहरात हेलिपॅड, एअरस्ट्रीप उभारण्याचेही नियोजित आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.