Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फडणवीसांची मोठी खेळी ! 'ज्या' जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही 'त्या' ठिकाणी भाजपचा संपर्कमंत्री

फडणवीसांची मोठी खेळी ! 'ज्या' जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही 'त्या' ठिकाणी भाजपचा संपर्कमंत्री



मुंबई : खरा पंचनामा 

सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भाजपकडून विशेष नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात आता त्यांचे संपर्कमंत्री काम करणार आहेत. पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तीव्र संघर्ष सुरू असताना संपर्कप्रमुख हे नवे पद भाजपने निर्माण केले आहे. संपर्कमंत्री नेमून अप्रत्यक्षपणे मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर धाक राहावा, यासाठी भाजपची ही मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे.

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आपल्यालेच मिळावे, असा राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो. सरकार स्थापन झाल्यानंत, असे मंत्रिपदासाठी आणि चांगल्या खात्यासाठी जसे प्रयत्न झाले तसे स्व जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठीही नेत्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. परंतु तरीही तिन्ही पक्षातले काही नेते नाराज झाले आहेत. भाजपमधील नाराजी शमविण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी भाजपने संपर्कमंत्री पदाची निर्मिती केली आहे.

पालकमंत्रिपदाच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण करून कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यावर पक्षाचा भर असणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे कोणतेही काम अडू नये तसेच सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा, यासाठी संपर्कमंत्री प्रयत्न करणार आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही, तिथे जाऊन संपर्कमंत्री कार्यकर्त्यांच्या भावना हे संपर्कमंत्री जाणून घेतील.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.