शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्या घरावर आयकर विभागाची धाड
सातारा : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्ह्यातील बडे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर खात्याची धाड पडली आहे. सकाळपासूनच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या फलटण येथील घराची तपासणी सुरू केली आहे.
सुमारे 50 आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम या धाडसत्रात असल्याची माहिती मिळत आहे. कारखाने इतर व्यावसायिक ठिकाणी देखील आयकर विभागचे अधिकारी जाणार असल्याची माहिती आहे.
काहीच दिवसांपूर्वी संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजितदादा पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता त्यांच्या घरावर आयकर खात्याची धाड पडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता.
संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे निंबळकर यांचे चुलत बंधू आहेत. फलटन तालुक्यातील राजकारणात संजीवराजे सक्रीय आहेत. संजीवराजे यांचं उद्योग क्षेत्रातही मोठं काम आहे. गोविंद मिल्क नावाची फॅक्टरी, श्रीराम सहकारी साखर कारखान त्यांच्याकडे आहे. संजीवराजे, अनिकेतराजे निंबाळकर आणि विश्वाजीतराजे नाईक निंबाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.