Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बीट मार्शलकडून पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण, बारमधून ओढत नेलं अन्...

बीट मार्शलकडून पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण, बारमधून ओढत नेलं अन्...



नागपूर : खरा पंचनामा 

नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका पोलीस अधिकाऱ्याला काही पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की यात पोलीस अधिकाऱ्याच्या कानाचा पडदा फाटला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मारहाण होत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आपली ओळख सांगितली होती. संबंधित व्यक्ती पोलीस अधिकारी असल्याचं समजल्यानंतरही त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

पोलिसांनीच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेचा पुढील तपास वाडी पोलीस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेले पोलीस अधिकारी नक्षलविरोधी पथकात पोलीस निरीक्षक आहेत. रविवारी रात्री ते नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बारमध्ये गेले होते. याठिकाणी नागपूर पोलीसांच्या दोन बीट मार्शलने त्यांना बेदम मारहाण केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकला बारमधून ओढत पोलीस ठाण्यात आणलं आणि मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यात आल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आपली ओळख सांगितली होती. पण ओळख सांगितल्यानंतरही दोन्ही बीट मार्शलने त्यांना मारहाण केली आहे.

या मारहाणीत पीडित पोलीस निरीक्षकाचा कानाचा पडदा फाटला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज मडावी असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आता हा वाद नेमका कशामुळे झाला? बारमध्ये नक्की काय घडलं? याचा तपास पोलीस करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.