शिक्षणाच्या नावाखाली चिखलीच्या प्राजने केला कांड!
कुंभ मेळा अश्लील व्हिडिओ प्रकरण, शिराळा पोलिसांच्या मदतीने गुजरात पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
अहमदाबाद येथील मॅटर्निटी हॉस्पिटलमधील व्हिडिओच्या तपासात कुंभ मेळ्यात संगमावर स्नान करणाऱ्या महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर विकणाऱ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिखलीतील प्राज पाटील याच्या सहभागाने खळबळ उडाली आहे. बुधवारी पहाटे अहमदाबाद पोलिसांनी शिराळ्याचे पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मदतीने प्राजच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर गेलेल्या प्राजचे कांड समाजासमोर आले आहे.
शिराळा तालुक्यातील चिखली येथील प्राज राजेंद्र पाटील (वय २०) याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. नीट परीक्षेच्या अभ्यासासाठी गेल्या काही वर्षांपासून तो लातूर येथे रहात होता. तेथे त्याची ओळख प्रज्वल तेली याच्याशी झाली. त्यातून या दोघांनी केवळ कुंभ मेळाच नाही तर गुजरातमधील मॅटर्निटी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केले. याबाबत दाखल गुन्ह्यात तपास करताना गुजरात पोलिसांना प्राज पाटील आणि तेली यांनी कुंभ मेळ्यातील महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ अपलोड केल्याचे निदशर्नास आले.
या दोघांसह चंद्रप्रकाश फुलचंद हा व्हिडिओ बनवत होता. तर पाटील आणि तेली यु ट्यूब तसेच टेलिग्रामवर ते व्हिडिओ अपलोड करत होते. शिवाय या व्हिडिओंची ऑनलाईन विक्रीही ते करत असल्याचे गुजरात पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. टेलिग्राम चॅनेल लातूर आणि सांगलीतून चालवले जात असल्याचे समजल्यानंतर गुजरात पोलिसांची एक टीम प्राज पाटील याच्या शोधासाठी बुधवारी पहाटे शिराळा येथे पोहोचली. तेथे शिराळ्याचे पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांना गुन्ह्याची माहिती देऊन त्यांच्या मदतीने गुजरात पोलिसांनी प्राज याला ताब्यात घेतले.
प्राज चांगल्या घरातील मुलगा असून त्याचे आई-वडील सुशिक्षित आहेत. गुजरात पोलिस शिराळ्यात येण्याआधी दोन दिवस तो लातूरहून गावी आला होता. त्याने केलेल्या कृत्यामुळे सांगली जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.