बारावीचा फिजिक्सचा पेपर लीक, झेरॉक्स सेंटरवर उत्तरासह मिळाली प्रश्नपत्रिका!
गोंदिया : खरा पंचनामा
कॉपीमुक्त अभियानासाठी सध्या महाराष्ट्र सरकारसह जिल्हा यंत्रणा सुद्धा सज्ज असताना अनेक ठिकाणी बैठे पथक हे काम करीत आहेत. जेणेकरून कॉपीमुक्त परीक्षा व्हावी. परंतू या योजनेला कुठेतरी खो देण्याचे काम गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे.
अशातच गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील एका बारावीच्या परीक्षा केंद्रावर सोमवारी बारावी भौतिकशास्त्राचा पेपर लीक होऊन सर्व प्रश्न-उत्तरांची झेरॉक्स प्रत हाती लागली आहे. बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.
गोंदिया जिल्ह्यातील या प्रकारामुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शहरात त्याच शाळेत एक विद्यार्थी बारावीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आला. त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रावर मिळालेली झेरॉक्स प्रत दिली. झेरॉक्स कॉपीवर नऊ प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आढळली. त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. यावरून प्रश्नसंच बाहेर गेलाच कसा? व त्याची उत्तरे सोडवून झेरॉक्स, सेंटरवरून केंद्रावर आली कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग, व्हिडीओ चित्रीकरणंही होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आळं होतं. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास ते केंद्र कायमस्वरूपी बंद होणार असल्याचं देखील विभागाकडून सांगण्यात आलं होतं. 2018 पासून जे गैरप्रकार घडले त्या केंद्रावरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, लिपिक आणि शिपाई बदलले. या केंद्रांवर तटस्थ शाळेचे स्टाफ नियुक्त करण्यात आले होते. यावर्षी परीक्षा केंद्रावर कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.