Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयपीएस दिक्षित गेडाम यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर'साठी नामांकन सांगलीकरांनी मतदान करण्याचे आवाहन

आयपीएस दिक्षित गेडाम यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर'साठी नामांकन
सांगलीकरांनी मतदान करण्याचे आवाहन



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक दिक्षित गेडाम यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन आफ द इयर' या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. सांगली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यशस्वी झालेल्या श्री. गेडाम यांना सांगलीकरांनी भरभरून मतदान करावे असे आवाहन 'खरा पंचनामा'तर्फे करण्यात येत आहे.  

दिक्षित गेडाम हे सध्या मुंबई झोन ९ चे पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणून कार्यरत आहेत. मूळचे महाराष्ट्रातील असलेले श्री. गेडाम यांनी बीएससी पदवी प्राप्त केली आहे. २०११ मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षेत सिव्हील सेवा परिक्षेत ६४६ वे रॅंकिंग मिळवले. २०१२ च्या बॅचचे ते महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात रूजू झाल्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग, सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. सांगलीतून त्यांची बदली मुंबई येथे झाली. त्यावेळी त्यांनी झोन ८ चे डीसीपी म्हणूनही सेवा बजावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते मुंबईतील झोन ९ चे डीसीपी म्हणून कार्यरत आहेत. 

अभिनेता सैफ अली खान याच्यावरील खुनी हल्ल्याचा तपास त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. श्री. गेडाम सांगलीचे पोलिस अधीक्षक असताना त्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले त्यात ते यशस्वीही झाले. त्यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ ईयर' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. सांगलीकरांनी https://lmoty.lokmat.com/vote-en.php या वेबसाईटवर जाऊन श्री. गेडाम यांना भरभरून मतदान करावे असे आवाहन 'खरा पंचनामा'तर्फे करण्यात येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.