मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मशिदीवरील भोंगे काढा
हिंदू एकता आंदोलनची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोरदार घोषणाबाजी व निदर्शने
सांगली : खरा पंचनामा
मुंबई उच्च न्यायालयाने मशिदी वरील भोंग्याच्या विरोधात निकाल दिलेला असून त्याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी वृद्धांना व आजारी लोकांना त्रास देणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं नुकसान करणाऱ्या तसेच दंगल काळात गैरवापर होणाऱ्या मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मशिदीवरील भोंगे उतरवा उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, न्यायालयाने अनेक ठिकाणी यापूर्वी सुद्धा मशिदीवरील भोंग्या संदर्भात निकाल दिला परंतु सत्तेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस होती त्यामुळे मुस्लिम मतासाठी आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून सरकारने 31 मे पर्यंत गडकोट किल्ले इस्लामिक अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तशाच पद्धतीने राज्यातील सर्व मशिदी वरील भोंगे उतरवून भोंगे मुक्त महाराष्ट्र करावा. सांगलीमध्ये एका एका प्रभागामध्ये दहा - दहा मशिदी 100 - 200 मीटवर अंतरावर आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे. तसेच अनेक भोंगे अनधिकृत आहेत त्यावर त्वरित कारवाई करावी.
हिंदू एकता आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी आव्हान केले. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भोंग्या संदर्भात तक्रारी अर्ज संबंधित पोलीस स्टेशनना सर्वांनी करावेत. छापील तक्रार अर्ज कोणास पाहिजे असतील तर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने उपलब्ध करून दिले जातील.
याप्रसंगी दत्तात्रय भोकरे, विष्णू पाटील, परशुराम चोरगे, सोमनाथ गोटखिंडे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, प्रदिप निकम, नारायण हांडे, अविनाश मोहिते, मनोज साळुंखे, अरुण वाघमोडे, विनायक एडके, यश पाटील, राम काळे, सुजित राजोबा, प्रथमेश चौगुले, संभाजी पाटील आदिंसह हिंदू एक आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.