कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकाऱ्यांना अटक करा!
बीड : खरा पंचनामा
बीड जिल्हाधिकारी आणि लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कैदे करण्याचे आदेश बीडच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. एस. पिंगळे यांनी दिले आहेत. न्यायालयाने जिल्हाधिकारी आणि अभियंत्यांविरोधात वॉरंटही जारी केले आहे. भूसंपादनाची भरपाई रक्कम थकविल्याप्रकरणी ही कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील शेतकरी राजेश पोकळे यांची जमीन लघुपाटबंधारे विभाग (स्थानिकस्तर) बीड यांनी प्रकल्पासाठी संपादित केली होती. त्याची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने 2018 मध्येच दिले होते. पण वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कार्यवाही न झाल्याने पोकळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
त्यानंतर सोमवारी न्यायालयाने याबाबत आदेश काढून 13 लाख 19 हजार रुपयांच्या भरपाईसाठी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कैद करून नुकसान भरपाई वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. तसे वॉरंटही काढण्यात आले आहे. शिवाय या वॉरंटची अंमलबजावणी 21 मार्चपूर्वी करावी असेही न्यायालयाचे निर्देश आहेत.
एखाद्या व्यक्तीची प्रलंबित रक्कम फेडेपर्यंत न्यायालय संबंधित अधिकाऱ्याला तुरूंगात टाकण्याचे आदेश देते. ज्याचे पैसे येणे आहे अशी व्यक्ती न्यायालयाकडे (Court) दिवाणी अटकेची मागणी करतात. जर प्रकरण गंभीर आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असेल तर न्यायालय ही मागणी मान्य करते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.