टोल नाक्यावरील बेरीकेट्स चोरणाऱ्या एकाला अटक
सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरज-सोलापूर एक्सप्रेस वेवरील बोरगाव टोल नाक्यावरील बेरीकेट्स चोरणाऱ्या एकाला अटक करण्यात आल्याची माहिती सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी दिली.
बाबासाहेब दत्तु जाधव (वय ६५, रा. १०० डी मार्ट पाठीमागे त्रिमुती कॉलनी सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कृपाशंकर तिवारी (रा. बोरगांव टोलप्लाजा ता कवठेमहंकाळ) यांनी बेरीकेट्सचे काही भाग चोरीला गेल्याची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. निरीक्षक चौगले यांनी यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक शोध घेत असताना धामणी येथील एका हॉस्पिटलजवळ एका संशयिताला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाने संजय बनसोडे, बागडी, मेघराज रुपनर, अभिजीत पाटील, बंडु पवार आदींच्या पथकाने कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.