Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

टायर फुटून कार खांबावर आदळल्याने मुस्लिम धर्मगुरूंचा मृत्यू लक्ष्मीफाट्यावरील घटना; तिघेजण जखमी

टायर फुटून कार खांबावर आदळल्याने मुस्लिम धर्मगुरूंचा मृत्यू
लक्ष्मीफाट्यावरील घटना; तिघेजण जखमी 



सांगली : खरा पंचनामा 

येथील लक्ष्मीफाटानजीक चारचाकी गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात इस्लामपूर येथील मुस्लिम धर्मगुरूंचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले आहेत. आज दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.


हफीज अलीम मन्सूर बारस्कर (वय ५०, रा. इस्लामपूर) असे मृत धर्मगुरूचे नाव आहे. तर अस्लम मिस्त्री (६२), समीर सरवर मुल्ला (५०), फैय्याज लीयाकत इबुशी (५२ सर्व रा. इस्लामपूर) अशी जखमीची नावे आहेत. यातील समीर मुल्ला गंभीर जखमी झाले आहेत. 

मृत बारस्कर हे इस्लामपूर येथील आहेत. धर्मगुरू असल्याने समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. सांगलीतील एका कुटुंबात भेटीसाठी ते येणार होते. दुपारी चारच्या सुमारास इस्लामपूर येथील अस्लम, समीर आणि फैय्याज यांच्यासमवेत कारमधून (एमएच १४ बीसी ६६२४)  आष्टा मार्गे सांगलीकडे येत होते. त्यावेळी लक्ष्मीफाट्यानजीक त्यांच्या गाडीच्या पुढील बाजूचे टायर फुटले आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नव्या सिमेंटच्या रस्त्यावरून ती गाडी खड्ड्यात जात समोरील विद्युत खांबावर जोरदार आदळली. त्यात हफीज बारस्कर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तस समीर मुल्ला गंभीर जखमी झाले. 

अपघातानंतर तत्काळ १०८ रूग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकेतून जखमींना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत उपचार सुरू होते. फैय्याज आणि अस्लम यांची प्रकृती स्थिर असून समीर हे अतिदक्षता विभागात दाखल आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला असून याबाबतची नोंद केली आहे. बारस्कर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजतात समाजबांधव मोठ्या संख्याने शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.