Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'महायुतीच्या बातम्या नीट द्या, नाहीतर एकेकाला उडवेन'

'महायुतीच्या बातम्या नीट द्या,  नाहीतर एकेकाला उडवेन'



पिंपरी : खरा पंचनामा 

चाकण येथील औद्योगिक वसाहतीमधील निबे लिमिटेड मिसाईल्स कॉम्प्लेक्स अँड प्रिसिजन मशीनिंगच्या अत्याधुनिक मिसाईल्स अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही स्टेन गन हातांमध्ये घेतल्या. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बंदूकीने नेम लावण्याचा प्रयत्न केला. तर अजित पवारांनी जमलेल्या पत्रकारांकडे बंदूक धरली आणि 'महायुतीच्या नीट बातम्या द्या नाहीतर एकेकाला आम्ही दोघे उडवू' असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांसमोर मिश्कील भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला.

आज पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी चाकणच्या निबे उद्योग समूहाला भेट दिली. तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनीही हातांमध्ये एके ४७ बंदूका घेतल्या. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बंदूकीने नेम लावण्याचा प्रयत्न केला.

तर अजित पवार यांनी जमलेल्या पत्रकारांकडे बंदुकीचा नेम धरला आणि 'महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर एकेकाला आम्ही दोघे उडवू, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. त्यानंतर तेथे जमलेले सर्वजण मोठ्याने हसले. तसेच हसत हसत अजित पवार यांनी 'आता हे पत्रकार एवढंच छापणार' असा टोलाही पत्रकारांना लगावला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.