हत्तीवरून आमदाराची मिरवणूक काढणं आलं अंगलट
कार्यक्रमाच्या संयोजकांसह सांगलीतल्या देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल
पुणे : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीत भोर, मुळशी, वेल्हा (राजगड) विधानसभा मतदार संघातून शंकर मांडेकर हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. विधानसभेचे यश साजरे करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची पिंरगुट येथे हत्तीवरून मिरवणूक काढत पेढे वाटले होते.
मात्र, हा प्रकार या कार्यक्रमाचे संयोजक आणि कार्यकर्त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने मिरवणुकीचे संजोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंयायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी रात्री पिरंगुट येथे आमदार शंकर मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. याची पुणे जिल्ह्याचे मानद वन्य जीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. तसेच वनविभाने संबंधित प्रकाराची माहिती घेतली. चौकशीत मिरवणुकीस परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे आणि सांगलीच्या देवस्थानच्या अध्यक्ष्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हत्तीला विशेष संरक्षण आहे. त्यानुसार हत्तीला मिरवणुकीत सहभागी करून घेण्यावर अनेक निर्बंध घालण्यात आलेली आहेत. असे असतानाही पिरंगुटमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच हत्तीला गर्दीमध्ये फिरविण्यासाठी आणण्यात आले होते. यामळे या मिरणुकीचे संयोजक राहुल बलकवडे यांनी सांगलीवरून श्री गणपती पंचायतन देवस्थानातून हत्ती आणल्याचे वन विभागाच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.