Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'सत्ता राजकारणासाठी महत्त्वाची, समोर गोड ताट मांडून ठेवलंय....'

'सत्ता राजकारणासाठी महत्त्वाची, समोर गोड ताट मांडून ठेवलंय....'



मुंबई : खरा पंचनामा 

सत्ता राजकारणासाठी महत्त्वाचे असते समोर गोड ताट मांडून ठेवले आणि दरवाजा उघडा ठेवून बोलत आहेत तर किती लोक थांबतील याविषयी शंका आहे, महाविकास आघाडी घडी बसणं कठीण आहे अशी कबुलीच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

आमच्या पार्टीतील अनेक जण पक्ष सोडून जातील, असं त्यांनी सांगितलं. जयंत पाटील पक्षात नाराज असून ते लवकरच पक्ष सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्या निमित्तानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व विषयांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

विधानसभा निकालात 50 तरी जागा येतील अशी अपेक्षा होती पण झाले नाही फार मोठा शॉक आम्हाला बसला. निवडणूक निकालानंतर मोठी नाराजी आणि नैराश्य आमच्या सगळ्यांमध्ये आलं यामुळे काही काळ अपेक्षित होतं त्यामुळे मी राजकीय सक्रिय पासून थोडा दूर राहिलो, असं पाटील यांनी सांगितलं. नवं सरकार आल्यावर त्यांच्या चुका तरी होऊ द्या मग बोलणं योग्य विनाकारण बोललं तर लोकही मान्य करत नाहीत, असं पाटील यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील विजयी झाले. पण, त्यांचं मताधिक्य घटलं. त्यामुळे मला मतदारसंघात आता जास्त लक्ष द्यायचं आहे. माझे हितचिंतक वाढले आहेत त्यामुळेच मी पक्ष सोडणार याची चर्चा घडवली जाते. सर्वच पक्षात माझे चांगले संबंध आहेत याचा अर्थ पक्ष बदलणार असे म्हणता येणार नाही.

चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट मध्यरात्री नाही तर सायंकाळी झालेली आहे त्यावेळेस विखे पाटील होते यामुळे राजकीय चर्चा झालेली आहे त्यावेळेस विखे पाटील होते यामुळे राजकीय चर्चा अशा ठिकाणी होत नाही प्रशासकीय कामकाजासाठीच भेटलो. मी देवेंद्र फडणवीस यांना उद्या काही प्रशासकीय कामासाठी भेटणार आहे. त्याची देखील बातमी होईल, असं पाटील यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. दारुण पराभव झाल्याने महाविकास आघाडीची घडी बसेल असे लोकांना वाटत नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अनेक वर्ष काम केले आहेत पक्षाच्या मिटिंग मधील काही मत जाहीररीत्या बाहेर मांडली त्याला आक्षेप आहे ते मांडायला नको होती आता प्रदेशाध्यक्षपदाच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची हे शरद पवार ठरवतील, असं पाटी यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

नवीन पक्षात तरुण पिढी निर्माण करत आहे त्यांचा विचार सुद्धा शरद पवार करतील सत्ता प्रत्येकाला आकर्षित करते आमच्या पक्षातले अनेक लोक बाहेर जातील संयम किती कुणाचे राहतायेत हे बघावे लागेल समोर गोड जेवणाचा ताट समोर आहे आणि दरवाजा उघडा ठेवला आहे यामुळे किती जण राहतील याविषयी शंका आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.