"भारताकडे खूप पैसा, आम्ही मतदारांसाठी दरवर्षी पैसे का द्यायचे?"
दिल्ली : खरा पंचनामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पदभार स्वीकारल्यापासून जगाला धडकी भरवणारे निर्णय घेतले आहेत. त्यात इतर देशाच्या टॅक्सचा मुद्दा असो व अमेरिकेतील स्थलांतरितांचा प्रश्न असो या सर्व मुद्द्यांवर त्यांनी आपली कठोर भूमिका जगासमोर मांडली आहे.
आता त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासंदर्भात आणखी एक निर्णय घेतला आहे. भारतातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अमेरिकेकडून देण्यात येणारा २० दशलक्ष डॉलर्सचा निधी थांबवण्याच्या DOGE विभागाच्या निर्णयाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले. भारतासारख्या देशाला अशी मदत देण्याची गरज का आहे यावर त्यांनी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच माध्यमांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी त्यांनी भारतीय मतदारांना प्रभावित करण्यासाठी जो पैसा खर्च केला जातो तो निधी आता थांबवण्यात आला आहे. त्यावरच विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी, "आम्ही भारताला दोन कोटी डॉलर्स का द्यायचे? त्याच्याकडे खूप पैसे आहेत. ते जगातील सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट आहेत. त्यांचे दरही खूप जास्त आहेत. मला भारताबद्दल आणि त्याच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे पण मतदारांच्या मतदानासाठी २० दशलक्ष डॉलर्स का द्यावे? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
१६ फेब्रुवारी रोजी, एलोन मस्कच्या नेतृत्वाखालील DOGE ने विविध देशांचा निधी थांबवण्याची घोषणा केली होती, ज्यामध्ये भारतात मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन दशलक्ष डॉलर्सची रक्कम देखील समाविष्ट होती. DOGE ने याविषयी माहिती देताना, "अमेरिकेने भारतात मतदारांची संख्या वाढवण्यासाठी तयार केलेल्या $20 दशलक्ष कार्यक्रमात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. " असे म्हटले आहे. भारताच्या वाढीव शुल्काबाबत ट्रम्प यांनी अनेक वेळा विधाने केल्याचे ज्ञात आहे. त्यांनी म्हटले आहे की भारत अशा देशांमध्ये आहे जिथे सर्वाधिक शुल्क आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.