सांगलीत गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक
1.219 किलो गांजा जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील संजयनगर येथील मंगळवार बाजार परिसरात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1.219 किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
अमीर मुसा जमादार (वय ३२, रा. पहिली गल्ली, हनुमाननगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अमली पदार्थ विक्री करण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमली पदार्थ विक्री, साठा, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक पथक तयार केले होते. पथक अमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेत असताना एकजण संजयनगर येथील मंगळवार बाजार परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने त्या परिसरात सापळा रचून जमादार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केल्यावर त्यामध्ये गांजा सापडला. तो जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक नितीन सावंत, संकेत मगदुम, आमसिद्धा खोत, अतुल माने, बाबासाहेब माने, अनंत कुडाळकर, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.