"बीडचा एसपी बदलण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे माझी तक्रार केली होती"
मुंबई : खरा पंचनामा
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या जवळचे लोक आरोपी आहेत. त्यामुळे मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडने बीडमध्ये कायदा हातात घेऊन अनेक कुरापती केल्याचे प्रकार पुढे आलेले आहेत. पोलिसांनी हाताशी धरुन अनेक गुन्हे त्याने दडपवल्याचा आरोप यापूर्वी अनेकांनी केलाय.
धनंजय मुंडे हे आपल्या मर्जीतील अधिकारी बीडला आणतात, अशी ओरड सुरेश धस, अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी केली. त्याला दुजोरा देणारी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. नागपूर प्रकरणावर बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंवर भाष्य केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी होती.
अनिल देशमुख यांना पत्रकारांनी विचारलं की, बीडमध्ये एवढी परिस्थिती भीषण होती तर याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होत नव्हती का? किंवा गृहमंत्री म्हणून तुम्ही बीडमध्ये लक्ष घातलं नव्हतं का? त्यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले, आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही कुणाच्या पसंतीचे अधिकारी दिले नाहीत, गुंडांना संरक्षण देणारं वातावरण राज्यात तयार होऊ दिलं नाही.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुढे म्हणाले की, बीडचे एस.पी. बदलण्यासठी धनंजय मुंडे माझ्या इतके मागे लागले होते की शेवटी त्यांनी माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. पोलिस अधीक्षक मर्जीतला हवा, यासाठी धनंजय मुंडेंची किती धडपड सुरु होती हे अनिल देशमुखांच्या विधानावरुन लक्षात येतं. देशमुख हे नागपूर प्रकरणावर मंगळवारी बोलत होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.