बंद कंटेनरला कारची धडक, 2 महिलांचा जागीच मृत्यू
पाचवड : खरा पंचनामा
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर पाचवड गावच्या हद्दीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बंद पडलेल्या कंटेनरला साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव इनोव्हा कारने जोरदार धडक दिली आहे.
यामध्ये या कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. सलमा मोमीन आणि महिदा शेख अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवले आहेत. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.