"माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, याने डोळा मारला की."
पुणे : खरा पंचनामा
मी आज फार काही बोलणार नाही. २० दिवसांवर गुढीपाडव्याचा मेळावा आहे. मी तिकडे दांडपट्टा फिरवणार आहे तर मग चाकू आणि सुरे कशाला काढू? सदानंद मोरेंनी आजच्या परिस्थितीवर बोलावं ही माझी अपेक्षा होती.
आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडला आहे यांचे आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले तरीही या पक्षातील माणसं एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले कष्ट करत असतात. पण आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना? तसे माझ्या पक्षात नाहीत. आज या फुटपाथवर, तिकडून डोळा मारला की त्या फुटपाथवर. आपण दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही. असाही टोला राज ठाकरेंनी लगावला. तसंच आपला पक्ष आणि संघटना मजबूत करणं जास्त महत्त्वाचं आहे. माझा जो गटाध्यक्ष आहे त्याला आणि त्याच्या घरातल्यांनाही वाटलं पाहिजे की माझ्या मुलाची काळजी घेत आहेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.