50 हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा
सांगली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जमिनीची नोंद घालण्यासाठी स्वतः तसेच खासगी व्यक्तिमार्फत 50 हजाराची लाच मागणाऱ्या कर्नाळ येथील तलाठ्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे सांगलीचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांनी दिली.
तलाठी तानाजी पांडुरंग फराकटे (वय 49, रा. विश्रामबाग, सांगली), गणेश विश्वास कांबळे (वय 30, रा. पद्माळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराने कर्नाळ येथे जमीन खरेदी केली आहे. त्याची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी फराकटे यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने सांगलीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यावर तलाठी फराकटे यांनी पंचांसमोर 50 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीनंतर 40 हजारांची मागणी करून कांबळे याला भेटण्यास सांगितले. कांबळे याने फराकटे यांच्यासाठी 50 हजारांची लाच मागून लाच देण्यास प्रोत्साहित केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे सांगलीचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक किशोर खाडे, ऋषिकेश बडणीकर, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.