कोरेगावात चालणारा वेश्या व्यवसाय तात्काळ बंद करावा
पुरीगोसावी यांच्याकडून पोलीस ठाण्यात निवेदन
सातारा : खरा पंचनामा
कोरेगांव पोलीस ठाणे हे तालुक्यांचे एकमेव पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते आणि याच तालुक्यांमध्ये तहसीलदार कार्यालय महाविद्यालय तसेच दवाखाने व्यापाऱ्यांची दुकाने दवाखाने बाजारपेठे असल्यामुळे नेहमीच कोरेगाव तालुका हा गजबजलेला असतो. आणि याच कोरेगांव बस स्थानकाच्या बाजूला जुन्या पाण्याच्या टाकीच्या परिसरांमध्ये झोपडपट्टीत अनेक दिवसांपासून परजिल्ह्यातील महिलांचा वेश्या व्यवसाय सुरू आहे. आणि याच परिसरांतून चांगल्या लोकांची महिलांची नेहमीच वर्दळ दिसून येते. मात्र या वेश्या व्यवसायाला नक्की कुणाचा आशीर्वाद अशी म्हणण्याची वेळ आली आहे. याच अनुषंगाने संभाजी पुरीगोसावी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगांव पोलीस ठाणेला तात्काळ अवैध व्यवसाय बंद करावा असे पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अनेक वेळा पोलीस निरीक्षकांना संपर्कांच्या माध्यमांतून समक्ष भेटून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे अखेर पोलीस ठाणेला निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी म्हत्रे, प्रकाश सावंत, प्रकाश धस यांच्या कार्यकाळात वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर चांगलीच कारवाई करण्यात आली होती. तरी तात्काळ कोरेगावात दवाखाने आणि व्यापाऱ्यांच्या परिसरांत वेश्या व्यवसाय बंद करावा असे निवेदन थेट कोरेगांव पोलीस ठाणेला पुरीगोसावी यांनी दिले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी संपर्कांच्या माध्यमांतून माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच कारवाई करू अशी ठाम ग्वाही दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.