सांगली जिल्ह्यातील वाहतूक शाखानी वसूल केला 54.59 लाखांचा दंड
राष्ट्रीय लोकअदालतीत केली कारवाई : पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांची माहिती
सांगली : खरा पंचनामा
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व वाहतूक शाखा आणि पोलिस ठाण्यांनी वाहन धारकांवर केलेल्या कारवाईपैकी ८ हजार ६५३ केसेसमध्ये तब्बल ५४ लाख ५९ हजार ६०० रूपये रोख दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिली.
निरीक्षक कुलकर्णी म्हणाले, वाहतूक शाखा सांगली, मिरज, तासगाव, विटा, इस्लामपूर आणि जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांकडून वाहन धारकांवर कारवाईसाठी विशेष मोहिम राबवली जाते. या मोहिमेत केलेल्या कारवाई केलेल्या वाहन धारकांनी दंड न भरल्यास त्यांच्याविरूद्ध न्यायालयात खटला दाखल केला जातो. लोकअदालतीमध्ये वाहतूक विभागाच्या केसेसचा दंड वसूल करण्यासाठी आवाहन केले जाते. दि. २२ मार्च रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत झाली. यामध्ये मोटार वाहन अधिनियमांतर्गत कारवाई केलेल्या ८ हजार ६५३ केसेसमध्ये तब्बल ५४ लाख ५९ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यातील सांगली, मिरज, तासगाव, विटा, इस्लामपूर वाहतूक शाखा आणि २५ पोलिस ठाण्याकडून यंदाच्या वर्षात गेल्या अडीच महिन्यात विशेष मोहिम, नाकाबंदी, होळी व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या कालावधीत एकुण ९ हजार ७३४ वाहन चालकांवर केसेस करण्यात आल्या. त्यांना एकुण ८२ लाख ९२ हजार ४०० रूपये दंड सुनावण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीचे वाहतूक शाखा निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, मिरजेचे सहायक निरीक्षक सुनिल गिड्डे, तासगावचे सहायक निरीक्षक राजेंद्र यादव, इस्लामपूरचे सहायक निरीक्षक राजेंद्र माने, विट्याचे उपनिरीक्षक सचिन माळी आणि जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.