Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इस्लामपूरजवळ गांजाचा साठा जप्त; तिघांना अटक 8.40 लाखांचा 29 किलो मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

इस्लामपूरजवळ गांजाचा साठा जप्त; तिघांना अटक 
8.40 लाखांचा 29 किलो मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

इस्लामपूरजवळ ओझर्डे-घबकवाडी रस्त्यावर शेतात वैरणीत लपवलेला गांजाचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करून 29 किलोचा साठा तसेच रोकड असा 8.40 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली 

सुनिल रामचंद्र कुंभार (वय २८, रा. ऐतवडे खुर्द, ता वाळवा), सुजय बबन खोत (वय ३४), परशुराम सिद्धलिंग पोळ, (वय ३४, दोघेही रा. आष्टा, ता वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भारत सरकारच्या "नशामुक्त भारत अभियान"च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात टास्क फोर्स तयार केला आहे. त्यांच्या सूचनेनुसार निरीक्षक शिंदे यांनी अमली पदार्थ विक्री, साठा, वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एक पथक तयार केले होते.

पथकाला वाळवा तालुक्यातील ओझर्डे-घबकवाडी रस्त्यावर काही तरुणांनी गांजाचा साठा केल्याची माहिती मिळाली होती. पथकाने त्या परिसरात सापळा रचला. दोघे संशयित वैरण घेऊन शेतातून आल्यावर पथकाला त्यांचा संशय आला. पथकाने तेथे तपासणी केल्यावर वैरणीखाली गांजाची पोती सापडली. तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्यांनी आंध्रप्रदेश येथील तेलन्ग नावाच्या व्यक्तीकडून गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. तिघाना अटक करून 29 किलो गांजा, रोकड असा 8.40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक नितीन सावंत, पंकज पवार, जयदीप कळेकर, सचिन धोत्रे, संकेत मगदुम, अरुण पाटील, अतुल माने, आमसिद्ध खोत, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, प्रकाश पाटील, विनायक सुतार, रोहन घस्ते, सुरज थोरात, ऋतुराज होळकर, गणेश शिंदे, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.