Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गृहउद्योगाच्या नावाखाली दीड हजारहून अधिक जणांना 86.25 लाखांचा गंडा, सोलापूरच्या एकाला अटक महिलेवरही गुन्हा : विश्रामबाग पोलिसांची कारवाई

गृहउद्योगाच्या नावाखाली दीड हजारहून अधिक जणांना 86.25 लाखांचा गंडा, सोलापूरच्या एकाला अटक 
महिलेवरही गुन्हा : विश्रामबाग पोलिसांची कारवाई 



सांगली : खरा पंचनामा 

गृहउद्योगातून लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील दीड हजाराहून अधिक लोकांची 86.25 लाखांना फसवणूक करणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सोलापूर जिल्ह्यातील संशयिताला अटक करण्यात आली असून महिलेला नोटीस देण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.

लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर, कविता राजकुमार शिंदे उर्फ कविता लक्ष्मण बंडगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनी दि. 3 जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान गृहउद्योग सुरु केला होता. यावेळी या उद्योगात सहभागी होण्यासाठी सांगली, मिरज, पलूस, तासगाव, कोल्हापूर या ठिकाणच्या तब्बल दीड हजारहून अधिक लोकांकडून दहा ते पंधरा हजार रुपये सुरक्षा ठेव घेतली होती. त्याबदल्यात चटणी पॅकिंगचे दर आठवड्याला बाराशे रुपये परतावा दिला.

त्यानंतर मात्र या दोघांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत न देता. परस्पर उद्योग बंद करून दोघेही पसार झाले होते. त्यांनी फसवणूक केल्याबद्दल चंद्रकांत कडोले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार निरीक्षक भालेराव यांच्या पथकाने लक्ष्मण बंडगर याला अटक केली असून महिलेला नोटीस बजावली आहे.

विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक स्वप्नील कृष्णा पोवार, महादेव घेरडे, सुनिल पाटील, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.