"आवादा कंपनीला सातपुडा बंगल्यावरून खंडणीसाठी धमकी"
मुंबई : खरा पंचनामा
वाल्मिक कराड, विष्णू चाटे व त्यांच्या टोळीने आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचं प्रकरण व बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण एकमेकांशी संबंधित आहेत.
या हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजड मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अटकेत आहे. कराडबरोबर त्याचे सात साथीदार न्यायालयीन कोठडीत आहेत. याच प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. आता आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणी सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी केली आहे.
आवादा कंपनीला धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयातून आणि सातपुडा बंगल्यावरून (मंत्री असतानाचा धनंजय मुंडे यांचा बंगला) धमकी देण्यात आली होती, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, आवादा कंपनीकडून खंडणी मागितली जात होती. मे महिन्यापासून खंडणीसाठी पाठपुरावा केला जात होता. त्याच दरम्यान, २८ मे रोजी कंपनीतील कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. सातत्याने खंडणी मागितली जात होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयात बोलावून खंडणी मागितली. पाठोपाठ सातपुडा बंगल्यावर बोलावून खंडणीसाठी धमकावण्यात आलं. सातपुडा बंगल्यावर बोलावण्यामागचा हेतू स्पष्ट होता की त्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्याला दाखवायचं होतं की आम्ही मंत्र्याच्या बंगल्यावर बोलावून तुला धमकावू शकतो. याचा अर्थ तुला पैसे द्यावेच लागतील. त्यामुळे यामागे धनंजय मुंडे होते की नव्हते ते देखील स्पष्ट आहे. एकदा नव्हे तर सहा वेळा अशा प्रकारे खंडणी मागण्यात आली. त्यामुळे मला वाटतं की आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावं."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.