व्हॉट्सअॅपचा भारतीयांना झटका !
बॅन केले 99 लाख अकाऊंट
मुंबई : खरा पंचनामा
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांमुळे व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांचा सतत सुधारणा केली आहे. कंपनीने वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे, संशयास्पद अकाउंट्सची माहिती देण्याचे आणि अनोळखी किंवा स्पॅम मेसेजेसशी संवाद साधू नये असे आवाहन केले आहे.
व्हॉट्सअॅप जे मेटा या कंपनीच्या मालकीचा लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे त्याने भारतामध्ये ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. या महिन्यात व्हॉट्सअॅपने एकाच महिन्यात जवळपास 99 लाख भारतीय अकाउंट्सवर बंदी घालून एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. हा निर्णय व्हॉट्सअॅपच्या सुरक्षेच्या उपाययोजना करून फसवणुकीला थांबवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
भारतामध्ये व्हॉट्सअॅपच्या मोठ्या वापरामुळे या प्लॅटफॉर्मवर फसवणूक करणारे आणि स्पॅम करणारे लोक सक्रिय होतात. त्यामुळे फेक अकाउंट्स, स्कॅम्स आणि स्पॅम मेसेजेस रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम केली आहे. कंपनीच्या ताज्या कंप्लायन्स रिपोर्टनुसार, 1 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान, 99 लाखाहून अधिक भारतीय अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. हे व्हॉट्सअॅपच्या इतिहासातील भारतातील सर्वात मोठे क्रॅकडाउन ठरले आहे.
व्हॉट्सअॅपकडे एक अत्याधुनिक ऑटोमेटेड प्रणाली आहे जी वापरकर्त्यांच्या क्रियाकलापावर लक्ष ठेवते. जर कोणतेही अकाउंट स्पॅम मेसेजिंग, फसवणूक किंवा प्लॅटफॉर्मच्या धोरणांचे उल्लंघन करत असेल, तर ही प्रणाली स्वयंचलितपणे त्या अकाउंटला फ्लॅग करून बंदी घालते.
या रिपोर्टमध्ये असे देखील म्हटले आहे की, 99 लाख बंद केलेल्या अकाउंट्सपैकी सुमारे 13.27 लाख अकाउंट्स पूर्वतयारीतच बंद केली गेली होती. म्हणजेच त्या अकाउंट्सवर वापरकर्त्यांची तक्रार प्राप्त होण्यापूर्वीच त्यांना ब्लॉक केले गेले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.