"माझ्या पाठीशी 'देवाभाऊ', कुणीही वाकडं करू शकत नाही"
पंढरपूर : खरा पंचनामा
अश्लील फोटो प्रकरणावरून भाजप मंत्री जयकुमार गोरे यांना विरोधकांनी चौहू बाजूने घेरले गेले आहेत. मंत्री गोरे यांना डिवचण्याची विरोधक कोणतीच संधी सोडत नाही. अशातच मंत्री गोरे यांनी देखील विरोधकांना आव्हान देताना दिसत आहे. 'माझ्या पाठीशी देवाभाऊ असल्यानं माझं कुणीही वाकडं करू शकत नाही', असे मंत्री गोरे यांनी विरोधकांना ठणकावले आहे.
मंत्री गोरे यांच्या उपस्थित पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील पिलीव इथं शाखा उद्घाटन झाले. मंत्री गोरे यांनी या कार्यक्रमात विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. मात्र, मंत्री गोरे यांच्या विधानानं विरोधक अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मंत्री गोरे म्हणाले, "जोपर्यंत माझ्या पाठीशी देवाभाऊ आहेत, तो पर्यंत माझं कुणीही वाकड करू शकत नाही. कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा. माय-माऊली आणि जनता माझ्यासोबत आहे". माझी एकही निवडणूक, अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही, असेही मंत्री गोरे यांनी म्हटले.
'माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ-सायंकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळ्या बाहुल्या बांधत आलेत. मात्र जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा आणि बाहुल्या बांधल्या, तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही', असे जयकुमार गोरे यांनी ठणकावून सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.