Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जैन प्रतिष्ठानच्या वतीने चित्र प्रदर्शनी रथयात्रेचा ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ

जैन प्रतिष्ठानच्या वतीने चित्र प्रदर्शनी रथयात्रेचा ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ



पुणे : खरा पंचनामा

स्मरणीय दादा गुरुदेव प्रभू श्रीमद् विजय राजेंद्र सूरिश्वरजी म. सा. यांच्या जन्मद्विशताब्दी निमित्त श्री राज राजेंद्र सूरिश्वरजी जैन प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यातील कात्रजपासून चित्र प्रदर्शनी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून राजेंद्र सूरिश्वरजी म. सा. यांना अभिवादन केले. तसेच, पाटील यांनी रथयात्रेला झेंडा दाखवून शुभारंभ केला. 

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना श्रीमद् विजय राजेंद्र सूरिश्वरजी म. सा. यांच्या जन्मद्विशताब्दीच्या शुभेच्छा दिल्या. तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरुण पिढीला यापासून परावृत्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागरुक राहिले पाहिजे; असे आवाहन पाटील यांनी याप्रसंगी केले. तसेच यावेळी डॉ. मुनिराज श्री लाभेश विजयजी म. सा. यांचेही आशीर्वाद घेतले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.