उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं हस्ते फार्माथॉन २.० या मॅरेथॉन स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण
पुणे : खरा पंचनामा
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन पुणे आयोजित व लहू बालवडकर सोशल वेलफेअर प्रस्तुत फार्माथॉन २.० या मॅरेथॉन स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी लहू बालवडकर, फार्माथॉन मुख्य संयोजक प्रा.प्रवीण जावळे, संयोजक सागर पायगुडे, डॉ. अश्विन माळी, पुनीत जोशी, अभिजित राऊत, वैभव मुरकुटे आदी उपस्थित होते.
सदर मॅरेथॉन स्पर्धा ६ एप्रिल २०२५ रोजी बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता इंडियन मेडिकल असोसिएशन, ऑल इंडिया केमिस्ट् अँड ड्रगिस्ट असोसिएशन, नर्सिंग कौन्सिल, पुणे विभागातील सर्व फार्मसी महाविद्यालये यांचा प्रमुख सहभाग असणार आहे. आरोग्य क्षेत्रातील सर्व असोसिएशन एकत्र येऊन आयपीए पुणे व लहू बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या माध्यमातून या भव्य स्पर्धेचे आयोजन दिमाखदार पद्धतीने करण्यात येणार आहे हे या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
सदर मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग करण्याकरिता सर्व पुणेकर नागरिकांना पाटील यांनी आवाहन केले आहे. तसेच सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे मुख्य संयोजक प्रा. प्रविण जावळे व लहू बालवडकर यांनी यावेळी म्हटले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.