धनंजय मुंडे गुन्हेगारांचा आश्रयदाता त्याला सह आरोपी करा
पुणे : खरा पंचनामा
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड याला प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी संतोष देशमुख प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. धनंजय मुंडे हेच गुन्हेगारांचे आश्रयदाता आहेत, अशी खळबळजनक टीकाही त्यांनी केली आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून ही प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले की, 'संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे. या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहिरपणे सांगून निःपक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रीपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.