गोव्यात सरकारी रेस्ट हाऊसमध्ये फुकटात घेतला पाहुणचार
महाराष्ट्रातील दोघांना अटक
मडगाव : खरा पंचनामा
अधिकारी असल्याचे भासवून सरकारी रेस्टहाऊस मध्ये पाहुणचार घेण्याचा प्रयत्न दोघांना अंगलट आलं आहे. तेथील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या भामट्यांचा डाव फसला व शेवटी त्यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामराजे शिंदे (३३) व दीपक शंकर गायकवाड (२९) अशी संशयितांची नावे असून ते दोघेही मूळ पुण्यातील कात्रज येथील रहिवाशी आहेत. रविवारी ही घटना घडली.
मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या जीवन हेल्प कौन्सिलचे अधिकारी असल्याचे त्या दोघांनी या रेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. दीपक हा रूमचे बुकिंग करण्यासाठी आला होता, तर रामराजे हा त्याच्या समवेत होता.
दोघांच्या वागण्यावरून रेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांच्याकडील ओळखपत्राची तपासणी असता ती बनावट असल्याचे आढळून आले आपले पितळ उघड पडल्याचे पाहून ते दोघेही भांबावले. त्यांच्याकडे कुठलीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती.
नंतर यासंबंधी फातोर्डा पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनस्थळी जाऊन, त्यांना ताब्यात घेतले. नंतर ३१९ (२) कलमान्वये पोलिसांनी त्यांना अटक केली. एक रात्र पोलिस कोठडीत घालवल्यानंतर त्यांना सोमवारी सायंकाळी जामिनावर सोडण्यात आले. पोलिस निरीक्षक नाथॉन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलिस तपास करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.