'काम चालू झालं तर याद राखा'
बीड : खरा पंचनामा
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या प्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करतानाचे व्हिडिओ, फोटो आणि फोनवरील संभाषणे यांचा आरोपपत्रात समावेश आहे. यापैकीच एक व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये, संतोष देशमुख यांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यामध्ये झालेले संभाषण आहे.
या संभाषणात, वाल्मिक कराड पवनचक्की प्रकल्पाचे काम बंद करण्याचे फर्मान सोडतो. 'काम आहे त्या परिस्थितीत बंद करा,' असा दम वाल्मिक कराड पवनचक्की कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना भरतो. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. 'निवडणुका झाल्या, मी आता मोकळा झालोय,' असे वाल्मिक या संभाषणात म्हणतो. हा संभाषणाचा तपशील पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केला आहे.
या संभाषणात विष्णू चाटे देखील सहभागी आहे. संभाषणाची सुरुवात सुनील शिंदे यांच्या 'नमस्कार विष्णू भाऊ' या वाक्याने होते. विष्णू चाटे 'आण्णा बोलतील' असे सांगून फोन वाल्मिक कराडला देतो. त्यानंतर वाल्मिक कराड अत्यंत कठोर शब्दांत सुनील शिंदे यांना धमक्या देतो.
'चालू केलं तर वातावरण गढूळ होईल,' 'ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं, त्याच परिस्थितीत बंद करा,' अशा धमक्या तो देतो. इतकेच नाही तर अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करतो. 'काम चालू झालं तर याद राखा,' अशी धमकीही तो देतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.