"माझं भाषणं करणंही आता अवघड झालंय"
मुंबई : खरा पंचनामा
'माझी ग्यारंटी घेऊ नका; माझं काही खरं नाही' असे धक्कादायक विधान माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत शक्तीपीठ आंदोलकांच्या समोर बोलताना केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भाने मी बोललो. माझं काही खरं नाही, मी इकडे, असं मी कशाला बोलेन. आता माझं भाषण करणं चोरीचं आणि अवघडच झालंय, अशी खंतही जयंत पाटील यांनी बोलावून दाखवली.
मुंबईत शक्तीपीठ विरोधक शेतकऱ्यांसमोर बोलताना जयंतराव पाटील यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांच्या या विधानामुळे अगोदरच भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेला बळ मिळाले होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्याच दिवशी तातडीने सफाईदारपणे स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. जयंत पाटील यांनी याअगोदरच्या एका कार्यक्रमाला शरद पवार यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बोलावले होते, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा चालली होती.
ते म्हणाले, राजू शेट्टी यांना उद्देशून मी आधी बरंच भाषण केलेले आहे. त्यात मी म्हटलेलं आहे की, तुम्ही आमच्याबरोबर राहिला असता तर आज लोकसभेत खासदार म्हणून गेला असता. त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न मांडला असता. त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल, त्यामुळे लोकसभेला ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील.
त्यामुळे लोकसभेला ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की, माझ्यावर काय विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही. कारण, राजू शेट्टी यांचंच काही काळापूर्वी हे म्हणणं होतं. त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ काढून इकडं पक्षात जाणार की तिकडं पक्षात जाणार, असा काढण्याची काहीही आवश्यकता नाही. आता माझं भाषणं करणंही चोरीचं झालेले आहे.
राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नसतो, असा यापूर्वीचा माझा अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा आमच्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भाने मी बोललो. माझं काही खरं नाही, मी इकडे, असं मी कशाला म्हणेन. आता माझं भाषण करणं अवघडच झालंय, अशी खंतही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.